गुज प्रीतीचे
अतुट बंध प्रेमाचे
तुझ्यामुळे हे जुळले
फुल प्राजक्ताचे सखे,
तुझ्यासाठी उमलले!
जन्मोजन्मींचे हे नाते
अलगद सावरावे
प्रीतीत तुझ्या साजणी,
बेधुंद मी वावरावे!
छबी नकळत तुझी,
प्रेमाने मी सजवावी,
नशिली होऊन रात
तुझ्या सवे जागवावी!
प्रेममयी या बंधनी
तुझ्यात गुरफटावे,
हळव्याच या क्षणी,
गुज मनी साठवावे!
सुख द्यावे संचिताचे,
दु:खांना मी सावरावे,
स्पर्श रेशमांचे पुन्हा,
नव्यानेच उमलावे!
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी, पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment