*बिंब-प्रतिबिंब*
सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोत ह्यांचे ‘बिंब-प्रतिबिंब’ हे विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्यातील गुरू-शिष्य संबंधातील रहस्य उलगडणारे पुस्तक वाचनात आले. आणी काही गुरू परंपरा आठवल्या मच्छिंद्रनाथ- गोरक्षनाथ, संत निवृत्तीनाथ- संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणी ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर महाराजांचे प्रतिबिंब पहायचे झाले तर ज्ञानेश्वरी पहावी वाचावी. प्रत्येक मनुष्य प्राण्याचे प्रतिबिंब असतेच पण स्वतातील अफाट अशा दुर्गुणांच्या मुळे आपल्याच ते दिसत नाही..स्वच्छ मनाने जर पाहिले तर खरच आपल्याला आपले प्रतिबिंब दिसेल जो पर्यंत आपण स्वताला जानत नाही तोपर्यंत ते दिसणार नाही..सदगुणांनी केलेली वाटचाल आपल्याला नक्कीच प्रगतीचे ज्ञानप्राप्तीचे प्रतिबिंब दाखवणारच,*हदय परिवारी कृष्ण मनोमंदिरात!!*
*आमुच्या माजघरी कृष्ण बिंबे!!*
बिंब आणि प्रतिबिंबाचं हे रूपक ज्ञानेश्वरीत तसेच अनेक सत्पुरुषांनी सांगितले आहे.. आपल्या चेहऱ्यावर डाग असेल तर आरशातल्या प्रतिबिंबावरचा डाग पुसण्यानं तो डाग जाणार नाही! आपली साधना,आपली धडपड ही आरशावरच्या आपल्या प्रतिबिंबात सुधारणा करण्यासाठी वाया जात आहे.. दोष आरशात नाही,आपल्यातच आहे, ही जाणीवच नाही.त्यामुळे वरवरचे बदल,वरवरचा देखावा यातच काळ जात आहे.आंतरिक बदलासाठी एक पाऊलही टाकलं जात नाही..खरा सद्गुरू आणि खरा सद्शिष्य यांनाच बिंब आणि प्रतिबिंबाची उपमा अगदी योग्य आहे. बिंब आहे म्हणूनच प्रतिबिंबाचं अस्तित्व टिकून आहे.बिंबा शिवाय प्रतिबिंबाला अर्थ नाही, अस्तित्वच नाही. जर देहरूपी घराच्या अंत:करणरूपी माजघरात कृष्ण अर्थात सद्गुरू बिंबत नसेल तर जीवनात त्यांचं प्रतिबिंब उमटणार तरी कुठून,जर जीवनात सद्गुरूमयतेच्या सुखाची नित्यपर्वणी हवी असेल तर अंत:करणातून भौतिक सुखाची आस सुटलीच पाहिजे..जर अंत:करणात भौतिक सुखाची आस आणि आसक्ती असेल तर जीवनातही त्याचंच प्रतिबिंब उमटत राहणार..‘त्याग आणि सेवा’ या दोन पंखांवर जर आपला जीवनपक्षी उडत राहिला तर त्या उड्डाणातून सर्व सृष्टीचं तसंच मानवजातीचं कल्याणच होईल. हा वारसा या संत महापुरुषानं आपल्यासाठी ठेवला आहे. स्वतःच्या जीवनाचे स्वच्छ प्रतिबिंब ते मागे ठेवून गेले आहेत. आपले बिंब- प्रतिबिंब आपणच उजळून घ्यायचीत. *उद्धरेत् आत्मन् आत्मानम* आपला उद्धार आपणच करायचा ही प्रेरणा देणारं सागरा सारखं अंतरातुन शांत,विवेकी,ज्ञानी वरून सतत हेलावणारं,खळखळणारं जीवन जगून स्वामी विवेकानंद गेले त्यांचा वसा युवकांनी घेतला पाहिजे.
*लेखन: - संदिप राक्षे ✍🏻*
No comments:
Post a Comment