हे नयन!
वेदनांच्या महासागरात
पाणवतात हे नयन
सुखाच्या आठवणीत
आनंदतात हे नयन !
प्रेमाचा ओलावा हदयात
रूजवतात हे नयन
नजरानजरेतून प्रेमाच्या
आधीन होतात नयन !
ममतेच्या स्पर्शाने
ओलवतात हे नयन
अपमान शरमेने
झूकतात हे नयन !
रागाच्या भरतीने
लालबुंद होती हे नयन
विरहाच्या वेदनेने
व्याकूळतात हे नयन !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment