फुलराणी !
फुलराणी फुलतेस तू ग,
पुष्पांच्या गंधित पुंकेशरातून
प्रकटलीस या धरतीवरी
सुगंधित अशा परा'गकणातून !
असंख्य नामे स्वरूपी तुझी
अगणित सुवाहासात न्हातेस
सप्तरंगाच्या उत्सवाने तुझ्या
या अवनीला ही सजवतेस !
धरतीवर पुष्पमाला बनून तर
कधी ईश्वराच्या गळा सजतेस
स्वर्ग नभीचा तु फुलराणी
आकाशगंगे सम भासवतेस !
कधी कधी आनंदाच्या क्षणी,
गरीब असो वा श्रीमंतास
सर्वांसाठी एकच भाव तुझे,
एकसमान सर्वास मानतेस !
दुःखमय त्या मृत्यूशय्येवर,
शेवटीही तुझीच ग सोबत,
हृदयाच्या अंतर्कप्प्यातून
दुःखालाही करते सुगंधित !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment