हुरडा!
मऊ मातीतून उगवल
हिरवाईच सुंदर लेण
शाळूच वावर,शिवार
गुळभेंडीच हे रान !
भरलेल हे कणीस
केल ताट्यातून मुक्त
त्याच्या हिरव्या दाण्याला
न्यायाळले मनसोक्त !
काळ्या मातीत मातीत
केले फावड्याने विवर
शेणाच्या गोव-यांची
मांडणी केली सुंदर !
कुचकुचीचे कणीस
गोवले ते गोव-यात
दिला त्याला अग्निडाग
भर उन्हाच्यापा-यात !
खरपूस त्याच्या सुवासाने
पेटला माझा जठाराग्नी
चव घेण्या हुरडयाची
आसुसली मनराणी !
किती होता तो गोडवा
त्या हुरड्याच्या दाण्यात
दही चटण्यांची होती
चव चवदार त्यात !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
हुरडा भाजणं व खाणं एक वेगळीच मजा आहे, छान अनुभव मांडला रचनेतून
ReplyDelete