राजाराणी!
कारवीच्या कुडाच्या ग,
सारवल्या आज भिंती
त्यात मिळतो आनंद
अशी नाही ग श्रीमंती !
कौलारू घराचा माझा
वाडा आहे चिरेबंदी
सर्जा-राजाची ग जोडी
उभी आहे दारामंदी !
नाही दाराला ग ताटी
नाही इथे ताट वाटी
खापराच्या भांड्या संग
संसारी रेशीमगाठी !
आगमन होई तुझं
लक्ष्मीच्या ग पाऊलांनी
चिमणीच्या उजेडात
सुखी राहू राजाराणी. !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment