तीन अनुभूती!
भावना आचार विचार
तीन प्रकार"मानवानुभूतीचे"
चालती जगी व्यवहार
बोल अंतरी विश्वासाचे !
राजस तामस सात्विक
तीन प्रकार"श्रध्देचे"
सुख घ्यावे क्षणिक
खेळ भाव भावनांचे !
इच्छा अनिच्छा परेच्छा
तीन प्रकार"प्रारब्धाचे"
मनी येता दुरेच्छा.
क्षेम होई संचयांचे !
शुध्द कोमल तीव्र
तीन प्रकार"स्वरांचे"
गुज मनीचे सकल
अंतर्नाद वास्तवाचे !
गायन वादन नर्तन
तीन प्रकार"संगीताचे"
भक्ती अन् मनोरंजन
प्रकटन होते भावनांचे !
बीजमंत्र मूलमंत्र मालामंत्र
तीन प्रकार"मंत्रांचे"
करूणामयी विश्वतंत्र
अगाध ईश्वरी सत्तेचे !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment