Wednesday, 31 January 2018

आर्त हाक,,मुलीची (कविता)

*आर्त हाक,,,मुलीची!

मी तुझ्यासाठी ओझ नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे

जन्मा आधी खुडतो कशाला
उगीच पाप तू करतो कशाला
मुलगा असला तुझ्या वंशाला
मी पण आहे पणती घराला
मी गर्भातूनी डोळे लावीले रे बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे...

मी तुझ्या साठी ओझं नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे....

गर्भ वेदना माझ्या आईला
घोर का लावता तिच्या जीवाला
समजून घ्या ना गर्भ मुलींचा
माया ममता आणी प्रेमाचा
या धरित्रीची वेल मीच रे बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे

मी तुझ्यासाठी ओझं नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे....

मी असते जिथे वसते लक्ष्मी,
धन-वैभवाची कधीच ना कमी
मायेची तुझ्या मी रे सावली
लडीवाळ मी रे तुझी बाहूली
जन्मास घालून धन्य तू हो रे बाबा,
मलाही तू जन्म घेऊ दे....

मी तुझ्यासाठी ओझ नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे.....

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...