ज्ञानेश्वरीतून,,,लागले शोध!
आधुनिक जगाच्या निर्मितीसाठी
ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी लिहीली
त्याच ज्ञानेश्वरीच्या ओवीतून
शास्त्रज्ञांनी अनेक उपकरणे शोधली!
उदय अस्ताचे प्रमाणे!
जैसे न चालता सूर्याचे चालणे!
तैसे नैष्कम्र्यत्व जाणे! कर्माचि असता!
या ओवीच्या आधाराने
शोध लावला शास्त्रज्ञाने
सुर्य असे स्थिर तर
पृथ्वी फिरे गोल वेगाने!
तया उदकाचेनि आवेशे!
प्रगटले तेज लखलखीत दिसे!
मग तया विजेमाजी असे!
सलील कायी!
या ओवीच्या आधाराने
शोध लावला शास्त्रज्ञाने
पाण्याच्या जोरात घर्षणाने
विजनिर्मीती होते प्रकर्षाने!
जेथ हे संसारचित्र उमटे!
तो मनरूप पटू फाटे!
जैसे सरोवर आटे!
मग प्रतिमा नाही !
या ओवीच्या आधाराने
शोध लावला शास्त्रज्ञाने
कॅमेरा आणि चित्रपट असा,
चिरकाल टिकवतो मनावर ठसा!
साहित्याचा आद्य साहित्यिक
भूगोलाचा खगोल शास्त्रज्ञ
इतिहासाचा इतिहासकार
ज्ञानयोगाचा खरा ज्ञानयज्ञ!
पृथ्वीतलावरती असा प्रकटला
पुतळा जणू कैवल्य- चैतन्याचा
भक्ती सागर तो जिव्हाळयाचा
संत ज्ञानेश्वर महामेरूच ज्ञानाचा!
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment