होळी पौर्णिमा!
वसंतात फुलला पळस
उन्हाने गाठला कळस
हुताशनी असे पौर्णिमा
शिमग्याचा शुभ दिवस!
करू व्यसनांची होळी
दुष्ट कामना न केलेली बरी
कल्पना चुकीच्या जाळू मनी
हीच होलीका पुजा खरी !
तम विचारांच्या समिधा
अर्पाव्यात पेटत्या अग्नीत
जगुयात असे माणूस होऊन
दुर्गुणांची कात जाळूया होळीत !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment