माय मराठी!
ज्ञानदेवाचे ज्ञान मराठी
तुकयाचे अभंग मराठी
नामदेवांची लेखणी मराठी
आध्यात्मिक!
फुलांचा गंध मराठी
कळ्यांचा बहर मराठी
निसर्गाचे स्वरूप मराठी
नैसर्गिक !
राजभाषा असे मराठी
गंधर्वाचे गान मराठी
सणांचा उत्सव मराठी
संस्कृती !
बोलावी माय मराठी
पहावी माय मराठी
स्मरावी माय मराठी
मनोभावे !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment