जाहिरात बाजीत अडकलेली जनता
सत्यपरिस्थितीचा विचार करणार का?
आज सकाळीच चहाची तलफ झाली म्हणून जवळच असणा-या जायका चहा मधे चहा पिण्यास गेलो होतो. काउंटर जवळ गेलो तर त्या हाॅटेल मालकाला दोन तरूण केविलवाणी विनंती करीत असताना दिसले मी थोडा जवळ गेलो तर ते त्या हाॅटेल मालकाला विचारत होते दादा आम्ही एक दिवस तुमच्या या शाॅप मधे चिरोटे विकायला ठेवू का? फक्त एक दिवस ठेवून बघा जर लोकांना आवडले तर मग नंतर ठेवा त्या एक दिवसाचे चिरोट्यांचे पैसे देऊ नका पण ठेवून बघा, शाॅप मालकाला पण त्यांच्या केविलवाण्या चेह-याची किव आली आणि ते म्हणाले चालेल तुम्ही घेऊन या हे दृश्य पहाताना माझे मन पण हेलावून गेले होते. त्यांचे बोलणे झाल्यावर मी त्या दोन्ही तरूणांना बाजूला घेतले अन विचारले तुमचे शिक्षण काय? त्यांनी सांगितले मी अजय जाधव एम बी ए झालो आहे आणि हा ऋषीकेश चव्हाण इंजिनिअर आहे त्यांचे हे शिक्षण ऐकून मी शाॅकच झालो. वडिल रिटायर्ड झाले त्यामुळे घरची जबाबदारी आमच्यावर आली अन ना नोकरी मिळत ना व्यवसायाची संधी मिळत, म्हणून हा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे.
नव्हतो नशिबावर विसंबून
गाडंभरून शिक्षण घेतलं...
तरी आहे कुटुंब माझं उपाशी
नोकरीच आमिष विष बनून भिनलं....
आई आणि बहिण घरीच चिरोटे तयार करतात आणि आम्ही दोघे मित्र ते अशा शाॅप मधे जाऊन विकतो त्यातून मिळणा-या पैशातून कुटूंब चालवतो. एकेकाळी उदयोग व्यवसायात अग्रेसर असणा-या शिक्षित तरूणाईवर ही वेळ यावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
आज सगळीकडेच अशी परिस्थिती दिसून येत आहे,
जीएसटी, नोटबंदी मुळे लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, एखादा उद्योग सुरू करण्या साठी तर बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात, मुद्रालोन देण्यास कोणतीही बँक उत्सुक नाही मग रोजगार निर्मिती होणार कशी फक्त कॉपोरेट कंपन्यांना सवलती देऊन त्यांना मोठया प्रमाणात अर्थसहाय्य करून प्रश्न कसा सुटणार, त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत ह्या योजना यशस्वी पणे राबवल्यास हा प्रश्न बऱ्याच अंशी सुसाह्य होईल, मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया सारख्या योजना मोठया गाजतवाजत सुरू झाल्या पण त्याची फलनिष्पत्ती शून्य आहे, मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती ह्याचे उद्दिष्ट पण म्हणावे तसे होत नाही, कुठल्याही क्षेत्रात आज तरुणांना रोजगार उपलब्धी म्हणावी तशी नाही, एनएसडी च्या अहवालानुसार 40 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले पण त्यापैकी फक्त 12% तरुणांना रोजगार मिळाला, अर्थात या सगळ्यांचा सबंध मंदावलेल्या अर्थकारणाशी आहे, भारत हा युवा वर्गाचा देश आहे पण त्यांना हवा तसा रोजगार उपलब्ध होत नाही जर जीडीपी हवा तसा वाढला नाही तर बेरोजगिरीची समस्या अतिशय चिंताजनक होवू शकते, जर नव्या संधी तरुणांना उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे पण नुसते कागदी घोडे नाचवण्याचे काम चालू आहे, फक्त भावनिक आवाहन करून ही परिस्थिती बदलणार नाही त्यासाठी ठोस भूमिका व प्रयत्न होणे आवश्यक आहे, 48 लाख कुशल मनुष्यबळांपैकी जवळपास 75% तरुण वर्ग बेरोजगार आहे, याचा अर्थ असा की प्रत्यक्ष कृती पेक्षा नुसती आकडेवारी मांडण्यात येत आहे, मोठमोठ्या बॅनर वर मोठमोठ्या आकड्यांची बेरीज दाखवून जनतेची दिशाभूल करणे प्रस्थापित सरकारने बंद करावे हीच इच्छा व विकासाचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकासाच्या दृष्टीने पावले उचलावीत ,
आज जीडीपी स्तर हा गेल्या तिमाहीत केवळ ५% आहे व नॉमिनल जीडीपी देखील गेल्या 15 वर्षात सर्वात कमी आहे त्यामुळे आर्थिक मंदीचे सावट सगळ्यात गंभीर आहे, या मंदीतून बाहेर येण्यासाठी सरकारने समजदारीने निर्णय घ्यावेत
जर तरुण हातांना काम मिळाले नाही तर हेच तरुण हात कधी दगड घेवून उठेल ते सांगता येत नाही, सरकारने त्या अनुषंगाने पावले उचलावीत
फक्त विकासाचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकास कसा होईल ह्यावर भर द्यावा हीच सदिच्छा..
आताचे बीजेपी सरकार खोट्या जाहिरातीने लोकांना उल्लु बनवते आहे आणि सामान्य जण त्याला बळी पडत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे आज या सरकारने उदयोग व्यवसायाकडे अजिबात लक्ष दिले नाही. भावनिक मुद्दे पुढे करून लोकांना देशभक्तीत अडकवून बौद्धिक गुलाम बनविले आहे. लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या महाराष्ट्रात मोठ मोठे उदयोग आणले आयटी पार्क आणले सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक व्यवसाय निर्माण केले परंतु याच भाजपा सरकारने हे सारे मोडकळीस आणले आज अनेक कंपनी बंद पडत आहेत उदयोगपती आत्महत्या करीत आहेत. याचा विचार आपण करणार नाहीत का? तरूणांच्या भविष्याची चिंता करणारच नाहीत का? या भाजपा सरकारची जाहिरात खरी की खोटी याचा विचार आपण करणार नाहीत का? उच्च शिक्षित मुलांच्यावर चिरोटे विकण्याचे दिवस आले असल्या अच्छे दिनचा विचार करणारच नाहीत का?
खोटे बोलून जाहिरातीच्या माध्यमातून सत्तेवर आलेले हे निकृष्ट सरकार आपण बदलणार नाहीत का?
आर्थिक मंदीचा राक्षस हळुवार पावलांनी वाटचाल करत आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा युववर्गाने गांभीर्याने विचार करावा....
विकासाच्या बिलोरी स्वप्नात
रोजगाराचे सोनेरी पान
मंदीच्या चक्रव्यूहात
अडकली माझी मान
अशी आजकालच्या तरुणांची स्थिती झाली आहे...
संदीप राक्षे ✍🏻
(प्रदेश सरचिटणीस)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र
८६५७४२१४२१

No comments:
Post a Comment