Monday, 9 December 2019

सत्य हे सत्यच असतं!

सत्य हे सत्यच असतं!

दुनियेच्या या बाजारी
माणसं कशी पारखावी
सकाळ दुपार सायंकाळ
भटकंती कशी ओळखावी!

कोण कधी कुठे कोणाचा
थांग इथे काही लागेना
देणं घेणं असल्या शिवाय
चांगभलं कुणीच बोलेना!

निष्ठा तर अशी वेशीला
सत्याची जात काशीला
असत्याची कमाल भारी
भले भले दिसे पंचक्रोशीला!

सत्य हे सदा सत्यच असतं
नीतिमत्तेच दळण दळतं
काळीज जरी तुटतं-जळतं
पण कळल्यावरच मात्र वळतं!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...