अतूल्य दुर्गस्थापत्याचा सर्वोत्कृष्ट नमुना अंकाई टंकाई किल्ला...
कवी विचार मंच शेगावं आयोजित ३ -या साहित्य संमेलनाची धावपळ सुरू होती ३ एप्रिलला होणा-या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून सारस्वत बंधू भगिनी आदल्या दिवशी म्हणजे २ तारखेलाच मुक्कामी येत होते. त्यातच आमचे परम मित्र कवी गणेश सांगुनवेढे सर व कवी, निसर्गप्रेमी, पेंटर देशमुख हे पण आले होते. शेगावहून रात्रीचा प्रवास करून पहाटे शिर्डीत पोहचले, शिर्डी मधेच आंघोळी उरकून दोघांनी साईबाबांचे दर्शन घेतले व आत्मा मालिक कोकमठाण येथे कार्यक्रमांसाठी आले. दोघांचे स्वागत केले. आत्मा मालिक च्या गेस्ट हाऊस मधे गझलकार राम गायकवाड व चित्रकार अरविंद शेलार सरांनी सर्वांची राहण्याची सुविधा केली होती. खुप दिवसांनी भेट झाल्याने खूप गप्पा मारल्या पण माझ्या मनात या दोघांना कुठे तरी घेऊन जायचे असा विचार आला क्षणाचाही विचार न करता मी सांगुनवेढे सरांना म्हणालो चला येवल्याला फिरून येऊ त्यांनी सुद्धा कोणतेही आडेवेढे न घेता त्वरीत होकार दिला. आम्ही तिघेजण माझ्या होंडा अॅमेज मधे बसून येवल्या कडे निघालो. कुठे जायचे ठरवले नव्हते जिकडे वेळ घेऊन जाईल तिकडे जायचे ठरले.
येवला हे गाव गेले अन मला अंकाई टंकाई किल्ल्याची आठवण झाली. खुप वर्षापासून या रस्त्यावरून जातो आहे पण किल्यावर जाण्याचा काही योग आला नाही कारण तो दूरून किल्ला दिसत नव्हता तो दिसायचा फक्त भला मोठा डोंगर,
आज विचार केला डोंगर तर डोंगर ही मंडळी पुन्हा कधीच इकडे येणार नाहीत पाहूयात तरी काय आहे अंकाई टंकाई किल्यावर, साहस तर करूयात कारण भर दुपारी बारा वाजता निघालो होतो, सूर्यदेव आग ओकत होता. साहसा व्यतिरिक्त किल्ला पाहायचा आणखी एक उद्देश म्हणजे इतिहासात डोकावून पाहयचं. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याला वैभवशाली व बोलका इतिहास आहे. इथे नुसत्याच कडेकपारी नाहीत, बुरूज नाहीत तर प्राचीन काळ जिवंत करणारे हे किल्ले म्हणजे स्वत:च एखाद्या पुराण वास्तु पुरुषासारखे आहेत. हा माझ्या मनात घोळत असलेला विचार अचानक सांगुनवेढे सरांनी विचारले कुठे जायचं? मी म्हणालो किल्यावर ते दोघेही माझ्याकडे कुतूहलाने बघू लागले, कदाचित मनात म्हणाले पण असतील काय विचित्र माणूस आहे हा भर उन्हात किल्यावर जायचे म्हणत आहे. पण माझ्या मुळे दोघेही काहीच बोलले नाहीत, "आलिया भोगाशी असावे सादर" हा विचार कदाचित देशमुख सर व सांगुनवेढे सरांच्या मनात नक्कीच आला असणार. रस्त्यावरील डांबर तप्त उन्हामुळे पाघळू लागले होते. इतकी भयंकर उष्णता होती.
अंधुकसा अंकाई किल्ला गाडीतून समोरच दिसू लागला होता. हळूहळू तो स्पष्ट दिसू लागला होता. दूरून पिंडीच्या आकाराचा दिसणारा किल्ला गावाजवळ आल्यावर वेगळाच दिसत होता. किल्यावर काय असेल काय नसेल यांची पुसटशी पण कल्पना नव्हती. गावापासून या किल्ल्याकडे जाण्यासाठी चांगला सिमेंटचा रस्ता बनवला होता. किल्याच्या पायथ्याशी गाडी लावली, गाडीतून बाहेर पडलो न पडलो तोच हवेतील उष्णता जाणवली तापलेल्या सुर्याची किरणे डोक्यावर पडताच क्षणात डोके तापले, एका सेकंदात इतका अनुभव आला तर संपूर्ण किल्ला चढायचा कसा माझ्या मुळे उगीच या दोघांना त्रास होणार मन कुठे तरी अस्वस्थ झाले. सांगुनवेढे सर गाडीतून उतरून एका मशिदी जवळ गेले त्या मशिदीवर चढवलेली चादर डोक्याला ऊन लागून नये म्हणून गुंडाळली कारण त्यांच्या कडील रुमाल मधेच रसाच्या गु-हाळात राहिला होता. डोक्याला संरक्षण म्हणून गुंडाळलेली ती चादर एखाद्या पीर बाबा सारखी दिसत होती. किल्यावर चढण्यासाठी पाय-या केल्या होत्या. एक एक पायरी चढत होतो तसं तसे किल्ला किती सुस्थितीत आहे ते दिसत होते.
अंकाई किल्ला व गाव नाशिक जिल्हयातील येवला तालुक्यात येते, पुरातन गाव म्हणून या गावची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. अंकाई आणि टंकाई हे किल्ले समुद्रसपाटीपासून बत्तीसशे फूट उंचावर व अंकाई गावापासून एक हजार फूट उंचावर आहेत. यादवकालीन एका ताम्रपटात ( इसवी सन ९७४) या किल्ल्यांचा उल्लेख ‘एककाई दुर्ग’ असा केलेला आहे. अंकाई किल्ल्याचा उपयोग यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. डोंगरशिखरावरून खानदेश भागातील व गोदावरी खोऱ्यातील विस्तृत प्रदेशावर नजर ठेवली जात होती. यादव काळात या किल्ल्यावर कायमस्वरूपी किल्लेदार व शिबंदी वास्तव्य करून राहत असत. शत्रू सैनिकांच्या हालचालींची माहिती देवगिरी किल्ल्यावर रवाना करण्यासाठी घोडेस्वार तैनात असत. किल्ला मजबूत व अजिंक्य असा होता. रामायण काळात या डोंगरावर अगस्ती मुनींचे वास्तव्य होते अशी कथा आहे. अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर स्वारी (तेरावे शतक) केली होती तेव्हा किल्ल्याचा विध्वंस झाला होता. जैन लेण्यांची देखील मोडतोड करण्यात आली होती. अंकाई-टंकाई हा किल्ला मोगल सम्राट शहाजहानचा सरदार खान खनान याने स्वारी करून १६६५ मध्ये ताब्यात घेतला. मॅकडॉवेल या इंग्रज सेनापतीने एकही गोळी न झाडता तत्कालीन किल्लेदाराकडून किल्ला खाली करून १८१८ मधे घेतला होता.
किल्ल्याच्या दिडशे ते दोनशे पाय-या चढून आम्ही कोरीव लेण्यांचा समुह आहे तिथे पोहचलो, घामाने अंग ओलेचिंब झाले होते. अंगावरील कपडे ओले झाले होते, एखादी वा-याची गरम झुळूक सुद्धा थोडा गारवा द्यायची आणि निघून जायची. घशाला कोरड पडली होती. श्वास वाढला होता, दम लागला होता. ईश्वर कृपेने या लेणीं जवळ पाणी विकणारा बसला होता. तिघांनी पण मनसोक्त पाणी पिऊन तहान शमविण्याचा प्रयत्न केला पण अंगातून वाहणा-या घामाच्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या. तहानेने व्याकूळ झाल्याने आजूबाजूला काय आहे ते विसरूनच गेलो होतो. जेव्हा थोडावेळ आराम केला तेव्हा अद्भूत अशा कोरीव लेण्या दिसल्या त्यापाहूनच सर्व शीण क्षणात निघून गेला. वरच्या रांगेत एकूण आठ व त्याखालील रांगेत दोन अशा दहा लेण्या तिथे दिसल्या. लेण्यांच्या समोरच पाण्याचे चार टाके दिसले. दुष्काळात सुद्धा दोन टाक्या मधे पाणी होते हे विशेष, बहुदा या लेणी दहाव्या अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात. लेणी क्रमांक ३ वर एक शिलालेखही आहे. लेणी क्रमांक दोन मध्यभागी असल्याने पहिली ती पहाण्याचे ठरवले, एक महिला तिथे बसलेली होती. थोडा विचार आला इतक्या उंचावर या लेणींत ही महिला काय करीत असेल तो विचार करतो ना करतो तोच माझी नजर उजवीकडे वळली अन मी थोडावेळ अवाक झालो. भली मोठी देवीची कोरलेली मुर्ती पाहून थक्कच झालो. आपोआप आम्ही तिघेही त्या देवीपुढे नतमस्तक झालो. ती देवी होती अनकाई माता, आता लक्षात आले की ही बाई देवीची भक्तीण असावी. देवीचे दर्शन घेऊन आत मधल्या लेणीत गेलो संपूर्ण कोरीव काम असलेली ही लेणी व मध्यभागात असणारी महादेवाची पिंड महाचमत्कारच भासत होता. थोडावेळ आम्ही त्या लेणींत बसलो. बोलताना आवाज घुमत होता. ध्वनी लहरी अनेक लहरीत परावर्तित होत होत्या त्या शांत झाल्या की निरव शांतता निर्मळ गारवा मिळत होता. लेणीतून बाहेरच पडू नये असे वाटत होते. पण पुढची चढाई करायची होती. बाहेर आलो तर लेणीच्या मुख्यव्दारावर बारीक कलाकुसर, प्राण्यांची शिल्प, खिडक्यांची दगडी जाळी, हे सार नक्षीकाम कलेचा जणू सारीपाटच समोर मांडून उभं आहे असं भासत होतं. तीर्थंकरांच्या मूर्ती, द्वारशिल्पे अन् गूढ वाढविणाऱ्या मूर्ती पहायला मिळाल्या, तर काही मूर्तींच्या पायथ्याला शिलालेख कोरले होते. लेण्यांचा हा मुख्य सोहळा अनुभवून पुढे निघालो. लेण्यातील गारव्याने अंगातली उष्णता कमी झाली होती..लेण्यातील उत्कृष्ट कलाकुसर पाहून तिघांच्या पण अंगात उत्साह संचारला होता. ये तो सुरवात है पिक्चर अभी बाकी है या जोशात पुन्हा किल्ला चढायला सुरवात केली..
आता पाय-या संपून कच्चा रस्ता सुरू झाला होता. डबराचा खच जागोजागी पडला होता. त्यावरून चालत असताना काही चिरे बुटातून आरपार होणार नाही याची काळजी घेत होतो. सुर्य आता माथ्यावर आला होता. रस्त्याच्या कडेला आस-यासाठी साधे झुडूप पण नव्हते, फक्त होती ती सुबाभूळ जळालेल्या अवस्थेतील, टनटनीची झाडं पण पाण्याविना सुकून गेलेली, पहिला टप्पा पार करून किल्याच्या मुख्यव्दारा जवळ आलो.
येथूनच अंकाई आणि टंकाईवर जाण्यासाठी हा सामाईक दरवाजा जात होता. यातील डाव्या बाजूने आम्ही मुख्य किल्याकडे निघालो. एकामागून एक असे सुंदर दरवाजे पार करून आम्ही मार्गस्थ होत होतो. कोरीव पाय-या आणि डोळय़ांना खुणावणारी तटबंदी हे सारे नजरेखाली घालत पुढे चालत होतो, जवळच अगस्ती ऋषींची एक गुहा दिसली अत्यंत प्रशस्त होती. हजारो वर्षापूर्वी अगस्ती ऋषींनी येथे साधना केली. हे सारं कळल्यावर या किल्ल्याबद्दल अजूनच गूढ वाटू लागले. अशा गोष्टी समोर यायला लागल्या की मग हे गड-किल्ले आणखीनच वेगळे भासू लागतात. या गुहेत आम्ही मनोभावे माथा टेकवला, तेथील कोरीव लेण्यात इतिहासाच्या पाउलखुणा स्पष्ट दिसत होत्या. आता कच्ची वाट संपून संपूर्ण दगडातून कोरलेल्या पाय-याहून चालत होतो. बरेच चाललो उंचावर आलो होतो. क्षणभर थांबायचे अन पुढे चालायचे, दम अधिकच लागत होता. थोडे पुढे आल्यावर एक भला मोठा चौकोनी तलाव दिसला, कोरडा पडला होता. काही भाग दगड मातीने झाकून गेला होता. उतरायला पाय-या होत्या, आम्ही त्या पाय-या उतरलो अन त्या चौकोनी तलावात आलो अगदी किल्याच्या कडेला हा तलाव होता त्याच्या कडेला दगडांचे बांधकाम केलेले होते. तेथून आम्ही खाली डोकावले तर संपूर्ण गाव दिसत होते, नागमोडी रस्ते अगदी सापासारखे दिसत होते. गावातील गर काडीपेटीच्या आकाराची दिसत होती. ते पहाता पहाता अचानक नजर मागे वळली तर तिथे एक लेणी दिसली आम्ही तिघेही त्या लेणींत शिरलो, त्या लेणीत कोरीव मंदीर होते, आत मधे गाभा-यात शिव पार्वतीची प्रतिमा कोरलेली दिसत होती. जणू काही जिवंत देवाचे दर्शन झाले असे वाटत होते, कारण सगळी कडे अंधार होता पण या शंकर पार्वतीच्या कोरीव दगडावर उजेड दिसत होता. सगळी कडे पाहिले पण पण हा उजेड कोठून पडतो आहे याचे रहस्य काही उलगडेना, खरच चमत्कारिक दुनियेत आलो असे वाटत होते. त्या शिलेचे दर्शन घेतले आजूबाजूचे कोरीव काम बघितले ते डोळ्यात साठविले, शिल्पकलेचा हा अनोखा नजारा पाहून शिल्पकला साकरणा-या हातांची आठवण झाली, त्यांना पण मनातून वंदन केले..
हे सारं पहात असताना उन्हाचा त्रास जाणवतं नव्हता पण अंगातून निघणा-या घामांच्या धारा थांबत नव्हत्या. अशातच एक सरळच चढण चढायची होती. ती इतकी सरळ रेषेत होती की पाय घसरला तर सरळ खाली म्हणून हात टेकवून टेकवून ती टेकडी चढलो, खुपच दम लागला होता. दुस-या महादरवाज्या पर्यंत पोहचलो होतो, दोन बाजूला भले मोठे बुरूंज उभे होते इतके वर्षं होऊनही सुस्थितीत उभे होते, एका बुरूंजाच्या बाजूला एक छोटासा दरवाजा दिसला तेथून भरपूर हवा आत मधे येत होती. आम्ही तिघेही त्या दिशेने गेलो. त्या दरवाज्यातून मनमाड शहर दिसत होते, (शेंडीच्या) अंगठ्याच्या आकाराचा निमुळता होत गेलेला हडबीचा डोंगर अगदी स्पष्ट दिसत होता. हा अनोखा नजारा पहात असतानाच कवी गणेश सांगुनवेढे सरांनी त्यांची कविता म्हणायला सुरवात केली...
आभाळ सारे धुंद झाले
वारा खाली मंद चाले
कशी सांगू,,, कहाणी
पाऊस आणी मी...
शेत शिवारी हिरवा चारा
पाहून नटला गाई वासरा
शीळ घुमविते पाखर दिंडी
कशी सांगू,,,, कहाणी
पाऊस आणी मी...
तुषार गाली शहारे आले
भाव आतुनी ओलसर झाले
अबोल प्रियकर मिठीत येता
कशी सांगू,,, कहाणी...
ही कविता ऐकून मन प्रसन्न झाले. प्रचंड शुद्ध हवा तनाला आणि मनाला तजेला देत होती. बराच वेळ तेथे थांबून पुढे निघालो, २००० हजार फूट वरती आलो होतो इथून पुढचा १२ शे फूटाचा टप्पा अतिशय अवघड होता, पाय-या होत्या पण त्या पण सरळ रेषेत होत्या त्यावरून सरळ चालणे अशक्य होते. तिथून पुढे चालण्यास मन तयार होईना, माझ्या सोबत आलेल्या सांगुनवेढे सरांना व देशमुख सरांना विनाकारण त्रास देतो आहे असे वाटले. कारण ते बिचारे साहित्य संमेलनासाठी आले होते, आरामासाठी आले होते मी त्यांना उगीच इकडे घेऊन आलो असे वाटायला लागले चढताना काही विपरीत घडले तर या विचाराने मन पुन्हा सुन्न झाले. एक पाऊल पण पुढे सरकेना, तेवढ्यात पेंटर देशमुख सर म्हणाले सर तुम्ही नका विचार करू आपण किल्यावर जायचेच त्याला सांगुनवेढे सरांनी दुजोरा दिला.. हारलेले मन पुन्हा खंबीर झाले. एक एक पायरी चढताना पायाला अक्षरशः गोळे येत होते. पण सांगुनवेढे सरांची व देशमुख सरांची हिंमत बघून मला पण काहीच वाटले नाही.. हळूहळू सातशे फुटांचा टप्पा पार केला, खुपच उंचावर आलो होतो. कधी भुयारी मार्ग तर कधी कोरलेल्या दगडांतून हा कठीण मार्ग पार केला. आकाशाला गवसणी घालतो की काय इतके उंचावर आलो होतो, अंतिम दरवाज्यातून पठारावर आलो होतो. समोरच एक देवीचे मंदिर होते त्या मंदिरातच बैठक मारली, आता पुढे चालण्याची अजिबात हिंमत उरली नव्हती. तसेही पुढे काहीच नव्हते चौबाजूने तटबंदी, एक शिवमंदीर होते. पण त्या पेक्षाही भयानक हवा होती. मी अन सांगुनवेढे सर तिथेच बसून राहिलो. देशमुख सरांना सांगितले जर तुम्हाला जमत असेल तर पुढे जावून या ते पण थोडे अंतर चढले आणि पुन्हा माघारी आले हवे मुळे पुढे चालणे कठीण वाटत होते. बराच वेळ आम्ही तिघेही त्यां देवी समोर बसून राहिलो. शेवटचा टप्पा पार करता नाही आला याची रूख रूख मनात होती, पण इतके हे अग्निदिव्य केले हे सोपे नव्हते, निघताना पुन्हा देवीचे दर्शन घेतले अन गड उतार झालो....
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६

No comments:
Post a Comment