Wednesday, 22 January 2020

गहिवरल्या व्यथा!

गहिवरल्या व्यथा!
तू असल्यावर असे गवसले सूर प्रीतगाणे
केळीवरचे फूल मखमल पिवळेजर्द दिवाणे

सुरांचा गंधार पेटला
शब्दात मल्हार दाटला
ओठांवर थरथरले अगणित धुंद मनाचे तराणे
दिव्यापरी फडफडल्या तारा
गवतातून तडफडला वारा
सप्तसुरांचे रंग संपले विरले मंद तराणे
शब्दांचे हुंकार कोपले
विरहिणीचे गुणसार लोपले
गानलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

1 comment:

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...