Thursday, 14 December 2017

अधुरे प्रेम (कविता)

*अधुरे प्रेम*

दूर नको जावू सखे,
आयुष्यात येवून जा...
तुझे-माझे जुने सारे
पुन्हा एकदा स्मरून जा...

तुझ्या सूरमयी तानांना
ताल माझा जुळवून जा...
नादमयी कंठानी तुझ्या
गीत माझे गाऊन जा...

तुझा मोहमयी गंध
श्वासात माझ्या ठेवून जा...
अधु-या प्रेमास आपुल्या
सुगंधमय करुनी जा...

मखमली स्पर्शाचे चांदणे
तनामनात झिरपुनी जा...
धुंद-मंद मिलनाचा,
ठेवा हृदयांस देवुनी जा...

मोहक रूप तुझे,
नेत्री माझ्या साठवुनी जा...
आठवणींचा हिंदोळा
पुन्हा नव्याने हलवूनी जा...

*संदिप राक्षे,भोसरी पुणे..*✍🏻
*८६५७४२१४२१*
दि.२४/११/२०१७

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...