एक कवडसा!
एक कवडसा "स्नेहाचा"
तुझ्या माझ्या नात्याचा !
एक कवडसा "जिव्हाळयाचा'
निस्वार्थ,अतुट प्रितीचा !
एक कवडसा "मैत्रीचा"
तुझ्या माझ्या निरागसतेचा !
एक कवडसा "भावनांचा"
तुझ्या माझ्या रेशिमगाठीचा !
एक कवडसा "धीराचा"
अंतर्मनाच्या शांत हाकेचा !
एक कवडसा "काजव्यांचा"
अंधा-या रातीला न्याहाळण्याचा !
एक कवडसा "विचारांचा"
तुझ्या-माझ्या समजदारीचा !
एक कवडसा "स्वप्नांचा"
तुझ्या माझ्या भविष्याचा !
एक कवडसा त्यागाचा,
सुखी संसार होण्याचा !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment