नसती उठाठेव,,!
कोणाला आपले म्हणावे
कोणावर करावी दया
ज्याला आपले मानतो
तोच म्हणतो उडत गया
ख-याची किंमतच नसते
ड्युप्लीकेट दुनिया सारी
दिखाऊ पणाला भुलते
यांची मनोवृत्तीच न्यारी
दुसऱ्याचे झाकावे म्हणून
आपण होतो उघडे
आपल्या कडे नसले तरी
वाहतो दुनियेचे घडे
कोणाचेही व्हावे चांगले
असते सदोदित धडपड
लोक समजतात वायफळ
असते तयांची बडबड
कधी हे शहाणपणही
देतसे मनाला खंत
पण अशाने मूकेल
मदतीस खरा गरजवंत
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment