स्वागताध्यक्ष भाषण
साहित्यकणा साहित्य संमेलन नाशिक
5 व्या साहित्यकणा फाऊंडेशनच्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून या समर्थ मंगल कार्यालय नाशिक येथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. मराठी मायमाऊलीच्या पुढे नतमस्तक होऊन ज्ञानोबा आणि तुकोबाला साष्टांग दंडवत घालून मी या सारस्वताच्या मेळाव्यात आणि एक प्रकारच्या साहित्य पंढरीत आपल्या सर्वाचे अत्यंत मनापासून स्वागत करतो. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक डाॅ. वेदश्री थिगळे, साहित्य काव्य संमेलनाध्यक्ष शिलाताई गेहलोत, प्रमुख पाहुणे डाॅ शंकरजी बो-हाडे, घनश्याम पाटील, उद्धवजी अहिरे, डाॅ. राहुल पाटील, किरण भावसार, संदीप चव्हाण तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन करणारे आमचे मित्र रविंद्र मालुंजकर यांचे पण मनःपूर्वक स्वागत करतो.
मराठीची पताका खांद्यावर घेऊन या नाशिक महानगरीत ही जी मांदियाळी इथे जमली आहे, ती गोदावरी काठावरचीच साहित्यगंगा आहे. या साहित्यगंगेत माझ्यासारख्या सामाजिक सांस्कृतिक व कला क्षेत्रातल्या छोटया कार्यकर्त्यांला स्वागताध्यक्ष होण्याचा जो बहुमान आपण मला एकमताने दिलात, याबद्दल मी अध्यक्ष संजयजी गोराडे, सचिव विलासराव पंचभाई, सहसचिव सुरेखाताई बो-हाडे, सल्लागार रावसाहेब जाधव, पुजाताई बागूल यांचा अंत:करणापासून ऋणी आहे.
आयुष्यात यश आणि अपयशाचे अनेक टप्पे असतात, ते सर्व पार करून जाताना कधी यश मिळते, कधी अपयश मिळते, कधी सुखाचे दिवस असतात. कधी अडचणीचे दिवस असतात. आज मी असे मानतो की स्वागताध्यक्ष पदाचा बहुमान करून, माझ्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा असा दिवस मला पाहायला मिळाला. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
इवलेसे रोप लावियेले द्वारी। त्याचा वेलू गेला गंगनावरी
संजयराव गोराडे सरांनी साहित्यकणा फाऊंडेशनचे पाच वर्षापूर्वी लावलेले साहित्यसंस्थेचे हे रोपटे आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. साहित्यकणा फाऊंडेशन आता सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहे. या संस्थेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे, हे फक्त संजय गोराडे सरांच्या मुळे, निखळ मनाचा साधा माणूस, षंढरिपूंचा थोडा सुद्धा प्रादूर्भाव या माणसावर जाणवत नाही, पुसटसाही ही दिसत नाही. त्यामुळे निस्वार्थ, सहदयी, मनमोकळा, मनमुराद आनंद लुटणारा अन इतरांनाही आनंद देणारा साहित्याचा पुजारी अन संत माणूस म्हणजेच संजयजी गोराडे सर, परंतु हे सर्व करताना पाठीवर लढ म्हणण्याची ताकद देणारा पण हवा असतो अन तो पाठीवरचा हात तसेच खंबीर साथ देणारे विलासजी पंचभाई..
खरतर कविता अन लेखन शिकलो ते साहित्यकणा फाऊंडेशन या समुहात सहभागी झाल्यावर ख-या अर्थाने साहित्याचा प्रवास सुरू झाला.
कविता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे कधीच उमगलं नाही. काव्य हे आपले आंतरिक प्रेरणास्थान आहे हे जाणवलं पण नाही. त्यामुळे या अगोदर कविता म्हणजे काय हा प्रश्न सारखा सतवायचा. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या कविते बद्दलच्या व्याख्या ऐकल्या, निःशब्दाला शब्दरूप करणारे साधन, मनाचे विविध भावतरंग उमटविणारे काव्य, भावनांचा उस्फूर्त आणि अद्भुत आविष्कार, सृजनशील आत्म्याचा उच्चार' अशा अनेक व्याख्या ऐकल्या परंतु कवितेची हीच ओळख आहे का? आणि लक्षात आले, जी कविता ओळखण्याचा आपण सतत प्रयत्न करत आहोत, ती कविता आपल्याला फार पूर्वीपासून ओळखीची आहे, अगदी कळायला लागण्या आधीपासून 'काऊ ये, चिऊ ये ' म्हणत कवितेनेच पहिला घास भरवला. जात्यावरच्या ओव्यांनी पहाटेची सुरवात झाली, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत गाऊन निजवले, शाळेत कविता भेटली ती तुकडोजी महाराजांची या झोपडीत माझ्या त्यामुळे जीवनाच्या जाणिवांचे आणि नेणिवांचे पदर उलगडत कळीचे फूल झाले. मनावर संस्काराचे बीज रूजले ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदाने, संत तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनपर ओव्यांनी, दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे मंगेश पाडगावकरांची ही रचना अजूनही उर्जा देऊन जाते, किसीकी मुस्कराहटो पे हो निसार किसीका दर्द मिल सके तो ले उधार शैलेंद्र यांनी लिहीलेली ही रचना सामाजिक बांधिलकीचे भान देऊन जायची.
कवितेने शिकवण्यापेक्षाही शहाणे आणि सुजाण केले. कवितेने भारावून जाऊनच आम्ही मित्रांनी कितीतरी मनोरथे रचली. कधी वाटे घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे, आकाशी झेप घे रे पाखरा ही रचना ऐकून तर अक्षरशः आकाशात झेप घ्यावी अस वाटायंच, किती वचने टिकली माहित नाही पण कवितेने स्वप्न बघायला शिकवले. कवितेने आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेत साथ दिली. आयुष्याच्या संध्याकाळी “आयुष्य कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत या आशादायी दृष्टीकोनाने उभारी दिली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कविता दीपस्तंभासारखी पाठीशी उभी राहिली. कधी मित्र म्हणून, कधी गुरू म्हणून, कधी पालक म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून, त्या मुळे कवितेशी एक ऋणानुबंध तयार झाले आहे. म्हणूनच कदाचित कविता म्हणजे काय हे सांगता येणे कठीण आहे. कारण नात्याची फक्त अनुभूती घेता येते, शब्दात मांडता येत नाही. चार भिंती, एक छप्पर, दरवाजा, खिडकी घराला असते ते घर या व्याख्येत, मनातले घर बसत नाही. तसंच कविता कुठल्याही व्याख्येत बसवता येत नाही. कवितेच्या अनेक नात्यांप्रमाणे तिची रुपेही अनेक आहेत. कविता हा केवळ आत्म्याचा उच्चार नाही तर एक अविष्कार आहे. एखादा कवी, गझलकार स्वप्नाचे बीज रुजवतो, भावनेच्या ऊबेत जोपासतो, विचारांच्या कोषांचे आवरण घालतो, त्यातून जे सुंदर फुलपाखरू बाहेर येते त्याला कविता असे म्हणतात....
स्वागताध्यक्ष भाषणाच्या शेवटी गुरू ठाकूर यांची एक अप्रतिम रचना सादर करतो आणि माझे भाषण संपवतो...
असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..
संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..
स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...
जय साहित्य जय साहित्यकणा
संदीप राक्षे ✍🏻
स्वागताध्यक्ष
साहित्यकणा साहित्य संमेलन

No comments:
Post a Comment