Wednesday, 31 January 2018

आर्त हाक,,मुलीची (कविता)

*आर्त हाक,,,मुलीची!

मी तुझ्यासाठी ओझ नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे

जन्मा आधी खुडतो कशाला
उगीच पाप तू करतो कशाला
मुलगा असला तुझ्या वंशाला
मी पण आहे पणती घराला
मी गर्भातूनी डोळे लावीले रे बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे...

मी तुझ्या साठी ओझं नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे....

गर्भ वेदना माझ्या आईला
घोर का लावता तिच्या जीवाला
समजून घ्या ना गर्भ मुलींचा
माया ममता आणी प्रेमाचा
या धरित्रीची वेल मीच रे बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे

मी तुझ्यासाठी ओझं नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे....

मी असते जिथे वसते लक्ष्मी,
धन-वैभवाची कधीच ना कमी
मायेची तुझ्या मी रे सावली
लडीवाळ मी रे तुझी बाहूली
जन्मास घालून धन्य तू हो रे बाबा,
मलाही तू जन्म घेऊ दे....

मी तुझ्यासाठी ओझ नाहीरे ऐ बाबा
मलाही तू जन्म घेऊ दे.....

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

तीन अनुभूती!(कविता)

तीन अनुभूती!

भावना आचार विचार
तीन प्रकार"मानवानुभूतीचे"
चालती जगी व्यवहार
बोल अंतरी विश्वासाचे !

राजस तामस सात्विक
तीन प्रकार"श्रध्देचे"
सुख घ्यावे क्षणिक
खेळ भाव भावनांचे !

इच्छा अनिच्छा परेच्छा
तीन प्रकार"प्रारब्धाचे"
मनी येता दुरेच्छा.
क्षेम होई संचयांचे !

शुध्द कोमल तीव्र
तीन प्रकार"स्वरांचे"
गुज मनीचे सकल
अंतर्नाद वास्तवाचे !

गायन वादन नर्तन
तीन प्रकार"संगीताचे"
भक्ती अन् मनोरंजन
प्रकटन होते भावनांचे !

बीजमंत्र मूलमंत्र मालामंत्र
तीन प्रकार"मंत्रांचे"
करूणामयी विश्वतंत्र
अगाध ईश्वरी सत्तेचे !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 30 January 2018

बीजमंत्र!(कविता)

बीजमंत्र!

नको लावून घेऊस
तू व्यसनांचा चटका
एक दिवस बसेल
तुला रोगांचा फटका !

गुटखा तंबाखू दारू
यांची नशाच न्यारी
प्रत्येक जण जातो
आहे त्यांच्या आहारी !

व्यसनांनी केली यांच्या
आयुष्याची पुरती होळी
उघडे झाले संसार
आली जीवनात झोळी !

निरोगी जीवन चांगल
हाच बीजमंत्र खरा
आयुष्य नसे पुन्हा
समजून घे तू पोरा. !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Sunday, 28 January 2018

राजाराणी!(कविता)

राजाराणी!

कारवीच्या कुडाच्या ग,
सारवल्या आज भिंती
त्यात मिळतो आनंद
अशी नाही ग श्रीमंती !

कौलारू घराचा माझा
वाडा आहे चिरेबंदी
सर्जा-राजाची ग जोडी
उभी आहे दारामंदी !

नाही दाराला ग ताटी
नाही इथे ताट वाटी
खापराच्या भांड्या संग
संसारी रेशीमगाठी !

आगमन होई तुझं
लक्ष्मीच्या ग पाऊलांनी
चिमणीच्या उजेडात
सुखी राहू राजाराणी. !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 18 January 2018

हुरडा!(कविता)

हुरडा!

मऊ मातीतून उगवल
हिरवाईच सुंदर लेण
शाळूच वावर,शिवार
गुळभेंडीच हे रान !

भरलेल हे कणीस
केल ताट्यातून मुक्त
त्याच्या हिरव्या दाण्याला 
न्यायाळले मनसोक्त !

काळ्या मातीत मातीत
केले फावड्याने विवर
शेणाच्या गोव-यांची
मांडणी केली सुंदर !

कुचकुचीचे कणीस
गोवले ते गोव-यात
दिला त्याला अग्निडाग
भर उन्हाच्यापा-यात !

खरपूस त्याच्या सुवासाने
पेटला माझा जठाराग्नी
चव घेण्या हुरडयाची
आसुसली मनराणी !

किती होता तो गोडवा
त्या हुरड्याच्या दाण्यात
दही चटण्यांची होती
चव चवदार त्यात !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 16 January 2018

फुलराणी!

फुलराणी !

फुलराणी फुलतेस तू ग,
पुष्पांच्या गंधित पुंकेशरातून
प्रकटलीस या धरतीवरी
सुगंधित अशा परा'गकणातून !

असंख्य नामे स्वरूपी तुझी
अगणित सुवाहासात न्हातेस
सप्तरंगाच्या उत्सवाने तुझ्या
या अवनीला ही सजवतेस !

धरतीवर पुष्पमाला बनून तर
कधी ईश्वराच्या गळा सजतेस
स्वर्ग नभीचा तु फुलराणी
आकाशगंगे सम भासवतेस !

कधी कधी आनंदाच्या क्षणी,
गरीब असो वा श्रीमंतास
सर्वांसाठी एकच भाव तुझे,
एकसमान सर्वास मानतेस !

दुःखमय त्या मृत्यूशय्येवर,
शेवटीही तुझीच ग सोबत,
हृदयाच्या अंतर्कप्प्यातून
दुःखालाही करते सुगंधित !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Monday, 15 January 2018

हे नयन! (कविता)

हे नयन!

वेदनांच्या महासागरात
पाणवतात हे नयन
सुखाच्या आठवणीत
आनंदतात हे नयन !

प्रेमाचा ओलावा हदयात
रूजवतात हे नयन
नजरानजरेतून प्रेमाच्या
आधीन होतात नयन !

ममतेच्या स्पर्शाने
ओलवतात हे नयन
अपमान शरमेने
झूकतात हे नयन !

रागाच्या भरतीने
लालबुंद होती हे नयन
विरहाच्या वेदनेने
व्याकूळतात हे नयन !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Saturday, 13 January 2018

संक्रांती!

संक्रांती!

आनंदाचा संक्रांती सण
होते स्फुरणदायी हे मन
पावित्र्यचा वसा घेऊन
औसायला जाते सुगरण

मनातली कटूता होते दूर
एका पांढऱ्या तीळातून
त्यात गुळाचा गोडवा
स्नेह-बंध वाढती त्यातून।

नका ठेवू अबोला, व्देष
नका ठेवू वाईट भावना
या मकर संक्रांती सणानिमित्त
नाते प्रेम जपा हीच सद्भावना

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

संदीप राक्षे✍🏻
निर्माता:- गुड मॉर्निंग मराठी चित्रपट

Thursday, 11 January 2018

नभांगणीची पाखर!

नभांगणीची पाखरं!

जीवन जगाव पाखरांनी
माणसांची काय मजाल
स्वैर स्वच्छंदी आनंदी
तोडून मनाचे मायाजाल !

पंखाखाली त्यांच्या पिलांना
नसतेच कसली भिती
आले जरी संकट दारी
धैर्याने मात काळावरती !

चोचीने विणतात घरटे
तंत्रज्ञानाचा नसे आधार
भल्या वादळ पावसाळ्यात
कधी होत नाही निराधार !

भरारी घ्यावी पाखरांनी
माणसांची काय बिशात
धरती-आकाश सारे,
बांधती एकीच्या बंधनात !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Wednesday, 10 January 2018

तुझ्याचसाठी!(कविता)

तुझ्याचमुळे !

कडू आठवणीत मला
जगण्याला गोडी आली
तुझ्याचमुळे !

उन ही सावली सम
भासले ग सखये
तुझ्याचमुळे !

काळोख्या मध्यान रात्री
चांदण ही हसले
तुझ्याचमुळे !

पाषाणावर हिरवळ
ही आज सजली
तुझ्याचमुळे !

काटेरी-खडतर रस्त्यावर
फुले ही उमलली
तुझ्याचमुळे !

निराशे नंतरही मनात
आशा ही फुलली
तुझ्याचमुळे !

जीवनातील कहरा नंतर
जगण्याला बहर आला
तुझ्याचमुळे !

सुंदर आहे आयुष्य
हे कळले मला फक्त
तुझ्याचमुळे ग,,,,,
तुझ्याचमुळे !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 9 January 2018

नवसंकल्प!(कविता)

नवसंकल्प !

करूया नवसंकल्प
मनी धरूनिया कास
असेल कोणी उपाशी,
त्यास भरवुया घास !

कनिष्ठांना देऊया प्रेम
जेष्ठांचा करूया आदर
दीनदुबळे व दिव्यांगाचा
आपणच बनूया आधार !

कोणी असेल दृष्टीहीन
त्याची बनूयात दृष्टी
आपल्याच स्व नयनांनी
त्याला दाखवूयात सृष्टी !

सामाजिक बांधिलकीची
मनी धरूनिया आस
एकमेका साह्य करू
देवू माणूसकीचा सहवास !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

नवसंकल्प!(कविता)

नवसंकल्प !

करूया नवसंकल्प
मनी धरूनिया कास
असेल कोणी उपाशी,
त्यास भरवुया घास !

कनिष्ठांना देऊया प्रेम
जेष्ठांचा करूया आदर
दीनदुबळे व दिव्यांगाचा
आपणच बनूया आधार !

कोणी असेल दृष्टीहीन
त्याची बनूयात दृष्टी
आपल्याच स्व नयनांनी
त्याला दाखवूयात सृष्टी !

सामाजिक बांधिलकीची
मनी धरूनिया आस
एकमेका साह्य करू
देवू माणूसकीचा सहवास !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Monday, 8 January 2018

आत्मोन्नती! (कविता)

आत्मोन्नती!

हिमालयाची स्थिरता
समुद्राची भव्यता
कमळाची अलिप्तता
सूर्याची तेजस्विता!

आनंद कठोर श्रमाचा
श्रद्धेने वाढणाऱ्या ध्येयाचा
सृष्टीतील मांगल्याचा
निसर्गातील पूर्णत्वाचा !

मार्ग मनुष्यत्वाचा
भरलेल्या आत्मविश्वासाचा
स्वातंत्र्यात आत्मसंयमाचा
आचराशी मेळ विचारांचा !

वाढवावा साठा विचारांचा
वेळेशी संवाद नियोजनाचा
मनावर विजय आत्म्याचा
समतोल शरीर मन बुद्धीचा !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Saturday, 6 January 2018

कावळा शिव ना!

कावळा शिव ना!

कावळा शिवता शिव ना
मोह सुटता सुटे ना
ईश्वर पटता पट ना
पावल वळता वळ ना !

धन संपता संप ना
दान करता कर ना
माया तूटता तूटं ना
मोह सुटता सुटं ना !

सोबती कुणी ना कुणी ना
नाती साथी ना संगती ना
मुक्ती मिळता मिळं ना
कावळा शिवता शिवं ना !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 4 January 2018

बिंब प्रतिबिंब (कविता)

बिंब प्रतिबिंब !

भाळी शोभे लालबुंद
बिंब तुझे देखणे
निसर्ग साक्षी प्रेम
जपूनी ठेव साजणे !

मुक्त सोडूनी दिली
मन पाखर मी ग
तुझ्याच कडे धावली
मनमुराद स्वैर ती ग !

तुझा स्पर्श होता
तन माझे थरथरे
जसा थेंब दवांचा
पर्णाहुनी झरझरे !

चंद्र चांदणे नभात 
पाही सुंदर रूप तुझे
नक्षत्रांच्या चांदण्यात,
भासे प्रतिबिंब तुझे !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१


आपल असच असतं ! (कविता)

आपल असच असत!

आपल बुवा असच असतं
सगळ्यां पेक्षा वेगळच असतं !

कोणाच्याही पाऊलावर पाऊल
ठेवून कधीच चालायच नसतं
स्व:ताला जे जे जमतं तेच
करून दाखवायच असतं !

नक्कल कुणाचीच करायची नसते
ती आपली म्हणून खपवायची नसते !

दुस-यांनी केले म्हणून
आपणही करायच नसतं
दुसऱ्यांच्या पेक्षाही वेगळ काही
करून दाखवायच असतं !

सत्याच्या मार्गावर चालायच असतं
असत्याला मातीतच गाडायच असतं !

स्वताला जमत नाही
म्हणून रडायच नसतं
स्वप्रयत्नातूनच,,
स्वतःलाच घडवायच असतं !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 2 January 2018

सृष्टीची लेकरे सारी (कविता)

सृष्टीची लेकरे सारी !

तिरस्कार करू नका
कोणत्याही जातीचा
अरे प्रत्येकजण आहे
आपल्या या मातीचा !

ऐकिव इतिहासाच्या 
भानगडीत पडू नका
भडकून एकमेकांची
डोकी फोडू नका !

इतिहास उगाळून
नाही होणार भल
चुकीचे स्वप्न म्हणून
एकत्र येवूत सकल !

माणूस म्हणून जगु
माणुसकीनेच हो वागू
जात-पातींच्या दरीला
नका हो आज बाळगू !

सृष्टीचीच लेकरे सारी,
सारे इथे समान आहे,
हिंदू,शिख,बौद्ध,मुस्लिम,
फक्त आणि फक्त मानव आहे !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

माऊली ज्ञान ईश्वरा(कविता)

माऊली ज्ञान ईश्वरा! 


संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन होवू दे 

माझा माथा त्यांचे चरणी लागु दे 

माऊली ज्ञान ईश्वरा,माऊली ज्ञान ईश्वरा! 


इंद्रायणीच्या तिरी आहे बेट सिद्ध

मंत्र तेथे उच्चारता होतसे सिद्ध 

ममाऊली ज्ञान ईश्वरा, माऊली ज्ञान ईश्वरा!


नाम घेता तयांचे  होईल आनंद 

ज्ञानेश्वरीच्या ओवीचा मज लागला छंद

माऊली ज्ञान ईश्वरा, माऊली ज्ञान ईश्वरा!


ज्ञानाचे दान दिले पसायदान

अखंड राहुदे मनी माऊली ध्यान 

माऊली ज्ञान ईश्वरा, माऊली ज्ञान ईश्वरा! 


चौ-यांशी सिद्धांचा भेटी सिद्ध मेळा

सिद्धश्वराच्या सानिध्यात कार्तिकी सोहळा 

माऊली ज्ञान ईश्वरा, माऊली ज्ञान ईश्वरा! 


अज्ञानाला होत असे येथे ज्ञान प्राप्त 

समाधीच्या सानिध्यात होई मन तृप्त 

माऊली ज्ञान ईश्वरा, माऊली ज्ञान ईश्वरा!


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

Monday, 1 January 2018

वेड मात्र तुझेच आहे (कविता)

वेड मात्र तुझेच आहे !

झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझेच आहे
शब्द माझे असले तरी
गीत मात्र तुझेच आहे !

प्राण माझा असला तरी
श्वास मात्र तुझाच आहे
प्रेम माझे असले तरी
सुगंध मात्र तुझाच आहे !

साज माझा असला तरी
श्रृंगार मात्र तुझाच आहे
रंग माझा असला तरी
अंतरंग मात्र तुझेच आहे !

नेत्र माझे असले तरी
ओघळणारे अश्रू तुझे आहे
हदय माझे असले तरी
स्पंदनं मात्र तुझीच आहे !

कंठ माझा असला तरी
सूर मात्र तुझाच आहे
मी वेडा असलो तरी
वेड मात्र तुझेच आहे !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...